धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते विनेश तावडे व अमित राऊळ यांचे आयोजन..
सावंतवाडी, दि.२५ : तालुक्यातील माडखोल धवडकी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
धवडकी येथील जिल्हा परिषद शाळा माडखोल नं.२ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते विनेश तावडे व अमित राऊळ यांनी केले आहे.
जिल्ह्यात वाढलेले अपघाताचे प्रमाण आणि अपुरा रक्तपुरवठा ही बाब डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी दिली आहे.

