सावंतवाडी,दि.०६: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचे देवस्थान.
या देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी १६नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
या दिवशी सकाळी पासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम,पूजा-अर्चा,त्यानंतर देवीचे दर्शन,ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे व रात्री महिला व पुरुष यांचे नवसाचे लोटांगण घालणे असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन येथील मानकरी व गावकऱ्यांकडून करण्यात आले आहे.
नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी या सोनुर्ली माऊली देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. या माऊली देवीच्या जत्रोत्सवास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक, तसेच देश विदेशातून भाविक भक्त मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला उपस्थिती दर्शवतात.