कणकवली,दि.०४: जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ निरुपणकार आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, रायगड) चे अध्यक्ष महाराष्ट्र भूषण,पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन भाजप महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी शुभाशीर्वाद घेतले.श्री चरणी जावून दर्शन घेत आमदार नितेश राणे यांनी आशीर्वाद घेतले आहेत.