आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा उबाठा कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव..!
कणकवली,दि.०१: देवगड तालुक्यातील फणसे थोटमवाडी तेथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. कणकवलीत ओम गणेश निवासस्थाने हा पक्षप्रवेश झाला. यात श्रावण राणे, सुबोध तांबे, दत्ताराम राणे, संकेत गावकर, सुरेंद्र राणे, आदी मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंजावाती दौऱ्यात दिसून येत आहे. ज्या गावात आमदार नितेश राणे पोचतात त्या ठिकाणचे उबाठा त्याचे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करत असल्याची अनेक उदाहरणे गेल्या महिनाभरात पहावयास मिळाली आहेत.अजूनही पक्षप्रवेशांचा ओघ सुरूच आहे. उबाठा मधील अनेक कार्यकर्ते स्वतःहून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपात पक्ष प्रवेश करत आहेत. अनेक लोक स्वतःहून ओम गणेश निवासस्थानी येऊन पक्षप्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
देवगड फणसे थोटमवाडी येथील या पक्षप्रवेशावेळी देवगड येथील भाजपचे पदाधिकारी बाळ खडपे, संजय बोबडी,राजा भुजबळ, वैभव फणसे,संदीप लाळये, संतोष गावकर, उमेश गावकर आदींसह असंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.