Site icon Kokandarshan

असगणी गावचे माजी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत

कणकवली,दि.२८: आमदार वैभव नाईक यांचे पक्ष प्रवेशाचे भाजपला धक्का तंत्र चालूच आहे.आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक भाजप कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. काल मालवण तालुक्यातील असगनी गावचे माजी पोलीस पाटील व हरिजन महासंघाचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी आपले प्रमुख कार्यकर्ते राजेंद्र तांबे,अतुल तांबे,रुपेश तांबे, यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.
यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना श्री.तांबे म्हणाले की असगणीसह दशकक्रोशी मध्ये आमदार वैभव नाईक यांनी अनेक विकासात्मक व समाजोपयोगी कामे केली आहेत.आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आ.वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारले असून त्यांचे वडील कै.विजय नाईक यांच्या सोबत आपण काम केले असून विजय भाऊंची विचारधारा आ.वैभव नाईक यांच्यामध्ये दिसून येते सर्वसामान्यांमध्ये वावरून सर्वसामान्यांच्या वेळे प्रसंगाला धावून जाणारे आमदार आहेत यामुळेच आपण त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना पक्षाची मशाल हाती घेतली आहे येणाऱ्या काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आपण जोमाने काम करू असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी आडवली-माडली विभागप्रमुख बंडू चव्हाण माजी उपतालुकाप्रमुख विठ्ठल घाडी,माजी विभागप्रमुख प्रवीण परब,राठीवडे उपसरपंच स्वप्निल पुजारे,असगनी सरपंच साक्षी चव्हाण,उपसरपंच देवेंद्र पुजारे,माजी सरपंच हेमंत पारकर,बूथ प्रमुख बंडु कासले,सुनील परब शामली पारकर,रमेश मिठबावकर, अरुण लाड,सुभाष धुरी,दशरथ कासले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version