सावंतवाडी,दि.२७ : शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. यनिमित्त उबाठा शिवसैनिकांकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ शिवसैनिक व शिवदूत अशोक परब, उल्हास परब, प्रशांत बुगडे, फिलिप्स रॉड्रिक्स विभागप्रमुख, समस्त निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान तळागाळातील लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नूतन सावंतवाडी तालुकाध्यक्ष मायकल डिसोजा यांनी स्पष्ट केले.