Site icon Kokandarshan

उबाठा देवगड अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर यांचा भाजपामध्ये प्रवेश..

कणकवली,दि.२२: आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली ओम गणेश निवासस्थानी शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक सेलचे देवगड तालुका अध्यक्ष इकबाल धोपावकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेशावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आरिफ बगदादी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप मेस्त्री,विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, नासिर मुकादम,मुस्ताफ चौगुले आदी उपस्थित होते.

Exit mobile version