Site icon Kokandarshan

भात शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा..आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

कणकवली,दि.१७ : गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने वाहून गेल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह कसा करावा हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या भात शेतीच्या नुकसानी बाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे तयार करण्यात येऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा,असे पत्र आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे.

Exit mobile version