Site icon Kokandarshan

राजभाषा हिंदी परीक्षेत भोसले स्कूलचे सुयश: तीन विद्यार्थ्यांना हिंदी प्रतिभा पुरस्कार…

सावंतवाडी, दि.१७: महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था आयोजित अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला पहिली ते दहावीतील एकूण १५० विद्यार्थी बसले होते. यापैकी दुसरीतील अयान डिसोजा, चौथीतील अर्णा सावंत आणि नववीतील वरदा केरकर यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण होत राष्ट्रीय राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार प्राप्त केला.

एकूण विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थी प्रथम तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये झाले. विद्यार्थ्यांना शाळेच्या हिंदी शिक्षिका प्राची कुडतरकर, रसिका कंगराळकर व महादेवी मलगर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version