Site icon Kokandarshan

सागरी प्लास्टिक प्रदूषणाचा मत्स्य प्रजातींवर दुष्परिणाम…डॉ. अशोक कदम वरिष्ठ वैज्ञानिक फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया(FSI).

सावंतवाडी,दि.१६: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभाग आणि विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन (VDCF) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिशरी सर्व्हे आॅफ इंडिया, मुंबई ब्रांच यांच्या वतीने आयोजित केलेल्या सागरी प्लास्टिक प्रदूषण या विषयावरील एक दिवसीय जनजागृती अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विनायक दळवी चॅरीटेबल फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष प्रा. विनायक दळवी , फिशरी सर्व्हे आॅफ इंडियाचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. अशोक कदम, डॉ. हर्षवर्धन जोशी, डॉ. स्वप्नील शिर्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ.प्रतिक्षा सावंत, प्रा.डॉ. गणेश मर्गज,
मच्छीमार संघटन मालवण चे श्री विकी तोरस्कर, कृषी काॅलेज मुळदे चे वैज्ञानिक डॉ. मनोज घुघूसकर, प्राणीशास्त्र विभागाचा प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक दळवी चॅरीटेबल फाउंडेशनचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राणिशास्त्राचे प्राध्यापक डाॅ.गणेश मर्गज यांनी केले. .त्यांनी सागरी प्लास्टिक प्रदूषणाचे धोके व यानिमित्त आयोजित केलेल्या सागरी प्रदुषणाबाबत जनजागृती अभियानाचे महत्त्व विशद केले. व विनायक दळवी चॅरीटेबल फौंडेशन करीत असलेल्या कामाची माहीती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व फिशरी सर्व्हे आॅफ इंडियाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक कदम यांनी एफ.एसआय चे प्रमुख उद्दीष्ठ त्यांनी घेतलेले प्रोजेक्ट करीत असलेले संशोधन
त्याचबरोबर सागरी प्लास्टिक प्रदूषणाचे धोके याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी समुद्रामध्ये असलेली मत्स्यसंपदा त्याचा उपयोग व त्यावर केले जाणारे संशोधन याची माहिती दिली.डॉ. स्वप्नील शिर्के यांनी खोल समुद्रात जाऊन पाण्याची खोली कशी मोजतात, त्याचबरोबर विविध प्रकारचे मासे कशा पद्धतीने पकडले जातात याबाबतची माहिती पीपीटीच्या माध्यमातूनन दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज लखमसावंत भोंसले यांनी हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या १२१ किमी ची किनारपट्टी लाभलेल्या जिल्ह्यातील कोळी बांधव व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.या माध्यमातून येथील विद्यार्थी सागरी प्रदूषणाबद्दल जागरूक होऊन या प्रदूषणाला आळा घालतील व स्वच्छ व आरोग्यदायी सी फुड येथील लोकांना मिळेल अशा पद्धतीचे स्वच्छ समुद्र किनारे ,प्लास्टिक फ्री झोन, येथे तयार झाल्यास येथील निसर्गसंपदा, सागरी जैवविविधता टिकून राहील असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील शिर्के यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्रा. एम ए ठाकूर यांनी मानले.

Exit mobile version