सावंतवाडी,दि.२१ : शिरशिंगे राणेवाडी येथील श्री नागेश रघुनाथ राणे वय (५४) वर्षे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते, त्यांच्यावर कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राणे यांना धार्मिक, सामाजिक क्षेत्राची आवड होती. शिरशिंगे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, काका, पुतणे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे यांचे ते पुतणे होत.