Site icon Kokandarshan

गोठोस येथे बांधकाम कामगारसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न..

सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने आयोजन…

कुडाळ,दि.१४ : तालुक्यातील गोठोस येथे सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण संदर्भात तालुका समंन्वयक दीपक कुडाळकर यांच्या वतीने कामगारांना प्रशिक्षण संदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान प्रशिक्षणात ५० ते ६० कामगारांनी नोंदणी केली.

यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृपचे प्रमुख पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई विलास नाईक,धुळोजी शिंदे, सिताराम शिंदे,नंदकिशोर साळवी,अनंत नाईक,राजन वरक,तसेच गोठोस गावचे ग्रामस्थ तथा कसाल तलाठी संतोष बांदेकर,मनसे युवा पदाधिकारी सागर सावंत यावेळी उपस्थित होते.

यावेळी कुडाळ तालुका समन्वयक दीपक कुडाळकर यांनी प्रशिक्षणाचे स्वरूप आणि फायदे सांगितले केले.पंधरा दिवसाचे प्रशिक्षण परीक्षा प्रमाणपत्र प्रशिक्षण,यशस्वी पूर्ण करणाऱ्या कामगारांना ४२०० रूपये मानधन मंडळातर्फे बँक खात्यात वर्ग केले जातील प्रशिक्षणाचे विषय या विषयासंदर्भात अमूल्य माहिती कामगारांना देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना अमित देसाई यांनी केली व आभार प्रदर्शन मिलिंद धुरी यांनी केले.

Exit mobile version