Site icon Kokandarshan

शिवसंस्कार टीमचे काम कौतुकास्पद!…विशाल परब

सावंतवाडी,दि.१३: छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा मातृभूमी शिक्षण संस्थेने सावंतवाडी मध्ये आयोजित केला, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात विविध ऐतिहासिक स्पर्धा, आणि त्याही सलग एक वर्ष घेण्याचा उपक्रम शिवसंस्कार माध्यमातून घेण्यात आला.

खरंतर मी म्हणेन की हा उपक्रम नसून एक ऐतिहासिक असा विक्रम आहे आणि यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेचा, तसेच असा वेगळा विचार करणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे निश्चितपणे कौतुक आहे. विविध स्पर्धांमधून विजय मिळवलेल्या सर्व विजेत्यांचेही मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. छत्रपतींचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे किंबहुना तो नव्या रक्तात रुजणे ही काळाची गरज आहे. समाजापुढची कितीतरी आव्हाने सोडवण्याची ताकद शिवविचारात आहे. मी कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रचंड खर्चिक असे भव्य ऐतिहासिक महानाट्य सलग तीन दिवस इथल्या जनतेसाठी मोफत उपलब्ध करून दिले, त्यामागे केवळ शिव विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हाच उदात्त हेतू होता. छत्रपतींच्या मनातले स्वराज्य घडवण्यासाठी युवकांची मनगटे बळकट करण्याची गरज असते. हाच शिवविचार घेऊन आम्ही सर्वजण युवा रोजगारासाठी काम करत आहोत, त्यात आपणा सर्वांचा सहयोग असू द्यावा असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले आहे.

सावंतवाडी येथील बॅ नाथ पै सभागृहात संपन्न झालेल्या शिवसंस्कार भव्य सन्मान सोहळा २०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभागृहात मान्यवरांची प्रचंड गर्दी होती. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विशाल परब यांच्यासह सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज श्री शिरीषजी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मातृभूमी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ सोनल लेले, शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, मुख्य समिती सदस्य ॲड सोनू गवस, संदेश देसाई, सौ सोनम ठाकूर, मनोज शेडगे, डॉ संगीता चांदेकर, निलेश केरकर, उदय देसाई, मंदार गावडे, नितीन नाईक, सौ.वृषाली शिंदे, डॉ. अंकुश सुद्रिक, अभिजीत राऊळ, श्री कृष्णा करमळकर, सौ. गौरी सुद्रिक, उदय पास्ते, सौ. संध्या प्रसादी, सौ संगीता चांडक, अवधूत किरपेकर, अवधूत बीचकर, मीडिया प्रमुख रुपेश पाटील आदी मान्यवरांच्या सहयोगातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Exit mobile version