Site icon Kokandarshan

महाराष्ट्राला हेवा वाटेल असे काम गेळे ग्रामपंचायत करून दाखवेल : संदीप गावडे

सावंतवाडी,दि.९ : गेळे येथील जमीन वाटप कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात संदीप गावडे म्हणाले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत नाही मात्र ते काम करून दाखवतात. त्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य राहिलं आहे. गेळे गावाच्या जमिनीचा प्रश्न सुटल्यामुळे आता या गावाच्या विकासात कोणतीही कमतरता भासणार नाही. पर्यटनाच्या माध्यमातून त्या गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. भविष्यात महाराष्ट्राला हेवा वाटेल असं काम गेळे ग्रामपंचायत करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करताना संदीप गावडे यांनी गेळे गावचा हा प्रश्न सोडविल्याबद्दल दोन्ही मंत्र्यांचे व प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त केले.यावेळी गावातील युवकांनी तयार केलेले गावासाठीच्या पर्यटनाचे चित्र दाखवण्यात आले.

Exit mobile version