Site icon Kokandarshan

भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय

सावंतवाडी,दि.०६: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी मधील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिकणाऱ्या महादेव धुरी याने मुंबई विद्यापीठाच्या कथालेखन अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे आणि प्राचार्य, सोनोपंत दांडेकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यांच्या हस्ते कांस्य पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. महादेव याने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.विजय जगताप, समन्वयक गायत्री आठलेकर, संयुजा निकम व डॉ. गौरव नाईक यांनी त्याचे अभिनंदन केले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version