Site icon Kokandarshan

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील वग महाराष्ट्राचा या नाट्याचा शनिवारी सकाळी ९.३० वा. सावंतवाडीत प्रयोग..

सावंतवाडी,दि.०४ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९.३० वा. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित टिव्ही(TV) कलाकारांचा अभिनय असलेले, संतोष पवार दिग्दर्शित ” वग महाराष्ट्राचा ” या नाट्याचा प्रयोग होणार आहे. तरी या प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले आहे.

Exit mobile version