Site icon Kokandarshan

कलंबिस्त येथे रक्तदान शिबीराचे आयोजन..

सावंतवाडी,दि.०४: तालुक्यातील कलंबिस्त येथे शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त
“शिवशक्ती युवक संघ, कलंबिस्त घणशेळवाडी” आणि “ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत कलंबिस्त (घणशेळवाडी) सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर आणि रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला कलंबिस्त पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे तसेच ज्यांना आपला रक्तगट करावयाचा आहे, त्या सर्व आबालवृद्धांनी शिबिराचे ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रमेश सावंत यांनी केले आहे.
रक्तदानासाठी येणार्‍या रक्तदात्यांनी रमेश सावंत (अध्यक्ष) (8275810900),
प्रविण सावंत (9405827403), निखिल बिडये (9527840460), रविंद्र तावडे (9421371483) यांच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली आहे.

Exit mobile version