Site icon Kokandarshan

गणित संबोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ शाळेचे उल्लेखनीय यश…

निकाल १००%.. तर ६ विद्यार्थ्यांना १००% गुण…

सावंतवाडी,दि.२८: ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेला या शाळेतील इयत्ता ५ वी मधील एकूण १३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १००% लागला आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विद्यार्थी पुढील प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या पैकी काव्या अमित तळवणेकर, वीरा राजीव घाडी, मानवी महेश घाडी, स्वरा गोविंद शेर्लेकर, पार्थ अशोक बोलके, हार्दिक अनिल वरक या सहा विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळविले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना गणित विषय शिक्षक महेश पालव यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक ध्रुवसिंग पावरा, शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version