Site icon Kokandarshan

अखिल भारतीय राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या दिलीप भालेकर यांचा सत्कार..

जिल्हा व्यापारी महासंघ व सावंतवाडी तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन..

सावंतवाडी,दि.१९: अखिल भारतीय राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांचा जिल्हा व्यापारी महासंघ व सावंतवाडी तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, निलेश धडाम, नंदन वेंगुर्लेकर, तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, चित्तरंजन रेडकर, बाळासाहेब बोर्डेकर, किरण सिद्धे, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी, अॅड. संजू शिरोडकर, हेमंत मुंज, वल्लभ नेवगी, आसिफ बिजली, संदेश परब, दत्ता सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर व सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर व सर्व व्यापारी संघाचे पदाधिकारी यांनी दिलीप भालेकर यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version