Site icon Kokandarshan

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी “जय भोसले”..

… तर दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी “सुमित दळवी” यांची निवड

सावंतवाडी,दि.२३ : ‘भ्रष्ट अनितीला करा लक्ष, न्याय हक्कासाठी व्हा दक्ष.!’ या टॅग लाईनखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची तर दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी सुमित दळवी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर, प्रदेश अध्यक्ष किरण बागुल यांच्या सूचनेनुसार तसेच कोकण विभाग अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या शिफारशीनुसार व पत्रकार जय भोसले व सुमित दळवी यांच्या एकूण कार्याच्या अवलोकनानुसार त्यांची सदर पदांवर स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाने ही निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल जय भोसले व सुमित दळवी यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version