दोडामार्ग,दि .२३: तालुक्यात असलेल्या ओरिजीन कंपनी बरोबर उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचे साटेलोटे आहेत. त्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आंदोलनातुन माघार घेतली आहे. ओरिजीन कंपनी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांना घेऊन काही ग्रामस्थांना दमदाटी करतात असा आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केला आहे.
ही बाब मनसे कधीही खपवून घेणार नाही. उबाठा गटाचे दोन्ही बाजुचे नेते लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. तु मारल्या सारख कर मी रडल्यासारख करतो पण अशा या भुलथापाना लोक आता बळी पडणार नाहीत. सासोली ग्रामस्थाच्या बाजुने मनसे ठामपणे उभी राहणार आहे.
येत्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग दौरा करणार त्या दौऱ्यात मनसे प्रदेश सरचिटणीस संदिप दळवी आणि कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात सासोली ग्रामस्थाची राज ठाकरेंशी भेट घालुन देणार त्या नंतर मनसे ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आणि सासोलीतील पिडीत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार. या “भू” माफियांची आणि त्यांना मदत करणाऱ्या पुढार्यांची पोलखोल करू आणि ग्रामस्थानच्या मदतीने “भू” माफियांना मनसे स्टाईलने जाब विचारून त्यांना हद्दपार करणार असल्याचे श्री राऊळ यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.