Site icon Kokandarshan

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळ येथील सौरभ गवंडे ह्याचे घवघवीत यश..

कुडाळ,दि.२१: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळ शहरातील अभिनवनगरमधील सौरभ संदीप गवंडे ह्याने घवघवीत यश प्राप्त करून महाराष्ट्रात अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. सौरभ यांच्या या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. सिंधुदुर्गातील युवकांनी सौरभ गवंडेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ह्या अशा कठीण परीक्षांमध्ये सहभागी होऊन कसे यश संपादन करता येईल ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सौरभ याच्या ह्या यशाबद्दल त्यांचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version