चिपळूण,दि.२१:(ओंकार रेळेकर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त आलेले उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी वेळात वेळ काढून उद्योजक प्रकाश देशमुख यांच्या हॉटेल अतिथीला सदिच्छा भेट दिली. यावेळी देशमुख कुटुंबियांकडून ना. पवार यांचे स्वागत केले. यानंतर ना. पवारांनी देशमुख कुटुंबीयांशी मनमोकळेपणाने चर्चा करीत परिवाराची विचारपूस केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार शनिवारी जनसन्मान यात्रेनिमित्त चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी सभा आटोपल्यानंतर ना. पवार यांनी उद्योजक प्रकाश देशमुख यांच्या हॉटेल अतिथीला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी देशमुख कुटुंबियांकडून ना. पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांचे देखील स्वागत करण्यात आले.उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी देशमुख कुटूंबियांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी उद्योजक प्रकाश देशमुख यांचे चिरंजीव सिद्धांत देशमुख, अभिनव देशमुख यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना उद्योगा विषयी देखील माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीने देशमुख परिवाराने समाधान व्यक्त केले आहे.