Site icon Kokandarshan

आंबोली नांगरतास शाळेतील नवनियुक्त शिक्षक सागर पाटील यांनी स्वीकारले तीन विद्यार्थांचे शैक्षणिक पालकत्व….

सावंतवाडी,दि.२०: माझी शाळा माझी जबाबदारी या मजकुरप्रमाने आंबोली नांगरतास शाळेतील शिक्षक सागर पाटील यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या शाळेतील धनगरवाडा येथील हुशार पण आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या ३ मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च ती मुले आपल्या शाळेत असेपर्यंत करण्याचे ठरविले आहे…. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेली मुल नकळत पाठीमागे राहतात पण त्यांना योग्य वेळी मदत भेटली तर ते सुध्दा एक अधिकारी होवू शकतात अस मत सागर पाटील यांनी व्यक्त केले. हे विद्यार्थी ना त्यांच्या नातेसंबंधातील आहेत ,ना त्यांच्या मित्र परिवरातील कुटुंबीयांतील सदस्य आहेत. वास्तविक पाहता शाळेत नवीन शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर त्या मुलांचा आणि त्यांचा संबंध आला. गरजू आणि गरीब मुलांतील टँलेंट शोधून त्यांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आणि आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा तेथील पालक वर्गाच्या मनावर बिंबवला आहे, असेच म्हणावे लागेल.
या मुलांची शैक्षणिक वाटचाल सुलभ व्हावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असे श्री पाटील म्हणाले.

त्यांनी दाखविलेल्या या दातृत्व भावनेचे आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर सामाजिक कार्यकर्ते संतोष पालेकर,संतोष कोटुळे, उमेश पडते यांनी कौतुक केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version