सावंतवाडी,दि.१७ : नवश्री पशुपालन केंद्र सावंतवाडी येथे डायोसेन युथ कमिशन आयोजित ख्रिस्ती बांधवांसाठीच्या वियानी कप २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब आणि बिशप अल्विन बरेटो यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात करण्यात आले. वियानी कप २०२४ ही क्रिडा स्पर्धा असून गेली ८ वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुलांबरोबरच मुली महिलांच्या संघाचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता.
यावेळी उपस्थित खेळाडूंना सौ. अर्चना घारे-परब यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व तंत्रज्ञान युगात शारिरीक तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे. याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी खेळ हेच एक प्रभावी माध्यम आहे. ज्यातून शरिर तंदुरुस्त राखले जाते असे प्रतिपादन सौ. घारे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास डायोसेन युथ कमिशनचे युथ डायरेक्टर – फादर कॅजीटन रॉड्रिग्ज, महिला युथ डायरेक्टर – सबीना अँनीमेटर आणि युथ प्रेसिडेंट – हेरमॉस रॉड्रिग्ज, फादर अलेक्स, फादर सालदाना, कॅथलिक बँक सोसायटीचे सेक्रेटरी मार्टिन अल्मिडा, बावतीस फर्नांडिस, मारिता फर्नांडिस, नॉबर्ट माडतीस, विवेक गवस आणि खेळाडू, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.