Site icon Kokandarshan

दोडामार्गात संदीप गावडे यांच्या माध्यमातून ३० भजन मंडळांना भजन साहित्य संच वाटप

दोडामार्ग,दि.१०: भारतीय जनता पार्टी व संदिप गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप सूरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील ३० भजनी मंडळांना संदीप गावडे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर भजनी साहित्य वाटप करण्यात आले. दोडामार्ग भारतीय जनता पार्टी कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, युवा मोर्चाचे पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवा शेटकर, युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपक गवस, दोडामार्ग माजी सभापती धाउस्कर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

हे भजनसंच देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीची अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या सर्व मंडळाना तबला १ नग, पखवाज १ नग, टाळ ४ नग असे भजनी साहित्य देण्यात आले आहे. हा कार्यक्रम दोडामार्ग भाजपा कार्यालयात पार पडला.

Exit mobile version