Site icon Kokandarshan

आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन केली विधिवत पूजा

सिंधुदुर्ग,दि.०८: कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक,मुलगा राजवर्धन नाईक,मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक,सुशांत नाईक,संकेत नाईक व परिवारातील सर्वांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.
दरम्यान नाईक कुटुंबियांकडून सर्व गणेशभक्तांना सदृढ आरोग्य, व सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घालण्यात आले.

Exit mobile version