Site icon Kokandarshan

संदीप गावडे आयोजित सुंदरवाडी दहीहंडी उत्सवाचे राजापूर गोविंदा पथक मानकरी

भव्य दहीदंडीत चित्तथरारक सात थर लावत दिली सलामी

ऑनलाइन शुभेच्छा देत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी साधला सावंतवाडीकारांशी संवाद

सावंतवाडी,दि.२८: भाजप नेते संदीप गावडे आयोजित भारतीय जनता पार्टी सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४ स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर रात्री अधिकच वाढत गेली. महापुरुष गोविंदा पथक नीमजगा बांदा गोविंदा पथकाने थरारक सात थरांची सलामी दिल्यानंतर हनुमान प्रसन्न राजापूर संघाने त्यांच्याही पेक्षा कमी वेळेत सात थरांची सलामी देत हा संघ सुंदरवाडी दहीहंडी महोत्सवाच्या या स्पर्धेचा मानकरी ठरला. या संघाला संदीप गावडे यांच्या माध्यमातून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

तर महापुरुष गोविंदा पथक नीमजगा बांदा गोविंदा पथकासह या महोत्सवात थरावर थर रचत सलामी देणाऱ्या अमेय तेंडुलकर मित्र मंडळ सावंतवाडी, शिवगर्जना बांदा, माऊली गोविंदा पथक वाफोली, पाटपरुळे म्हापण, महापुरुष मित्र मंडळ भटवाडी सावंतवाडी, प्रभात मित्र मंडळ गोविंदा पथक मळावाडी साळगाव या संघांनाही रोख ११ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच उपस्थित प्रेक्षकांमधून ‘बेस्ट इन्स्टा स्टोरी’ स्पर्धेतील विजेत्या अकरा स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात ‘स्मार्ट वॉच ‘ वॉच देण्यात आली. यावेळी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर भाजप युवा नेते संदीप गावडे आयोजित भव्य भारतीय जनता पार्टी सुंदरवादी दहीहंडी महोत्सव यादगार ठरला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन शुभेच्छा देतानाच सावंतवाडीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संदीप गावडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. मतदारसंघातील विवीध कार्यक्रमाचा माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व म्हणून ते विकसित होत आहेत असे यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले.

डीजेचा थरार, गोविंदा पथकांकडून एकाहून एक चित्तथरारक थरांवर थर रचत देण्यात येणारी सलामी व उपस्थित प्रेक्षकांचा पराकोटीला गेलेला उत्साह त्यामुळे या महोत्सवाची उत्कंठा अधिकच शिगेला जात होती. अधून मधून येणाऱ्या पावसांच्या सरींनी गोविंदा पथकांच्या उत्साहाला अधिकच उधान येत होते. ” गोविंदा रे गोपाळा ” बोल बजरंग बली की जय ” च्या जयघोषात तल्लीन होऊन गोविंदा पथकातील उपस्थित गोविंदा व दहीहंडी उत्सवाचा थरार याची देही याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षक जणू देहभान हरपून गेले होते. वेतोरे येथील सिंधुरत्न ढोलपथकाने आपल्या बहारदार वादनाने कार्यक्रमात अनोखी रंगत आणली होती.

तर ‘मुलगी झाली हो ‘ व ‘धागा धागा जोडते नवा ‘ फेम अभिमंत्री दिव्या फुगावकर व ‘ माझ्या नवऱ्याची बायको ‘ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात अनोखी रंगत आणली.त्यांच्या व्यासपीठावरील आगमनानंतर युवाईने एकच जल्लोष केला.


मुख्य कार्यक्रमात रंगत आणली ती विविध दहीहंडी मंडळांच्या उपस्थितीने. राजापूर येथील हनुमान प्रसन्न गोविंदा पथकासह सावंतवाडी तालुक्यातील एकूण आठ दहीहंडी मंडळांनी यावेळी उपस्थित राहत थरांवर थर रचत सलामी दिली. यावेळी उपस्थित दहिहंडी प्रेमींनी टाळ्यांच्या गजरात उपस्थित गोविंदांना प्रोत्साहीत केले.

या महोत्सवासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रमोद सावंत, माजी नगरसेवक मनोज नाईक, संदीप गावडे यांचे वडील एकनाथ गावडे, संदीप यांच्या मातोश्री सौ. सुनिता गावडे, वडिल एकनाथ गावडे, चंदन धुरी, जितेंद्र गांवकर, बंटी पुरोहित, गेळे सरपंच सागर ढोकरे, उमेश पेडणेकर, देवसू सरपंच रुपेश सावंत, म. ल. देसाई, दीनानाथ कशाळीकर, एकनाथ परब, अनिकेत आसोलकर, अशोक परब, माडखोल माजी सरपंच बाळू शिरसाट, भाऊ कोळंबेकर, प्रकाश दळवी आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर, शुभम धुरी व प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

चौकट
संदीप गावडे सावंतवाडीतील उभरते नेतृत्व : प्रभाकर सावंत
संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचा शतक प्रतिशतपणा ओथंबून भरलेला दिसतो.
सावंतवाडी मतदारसंघातील विवीध कार्यक्रमांमधून याचीच प्रचिती येत असून संदीप गावडे हे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व म्हणून विकसित होत आहेत, अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संदीप गावडे यांना शुभेच्छा दिल्या. तर माजी आमदार राजन तेली यांनी संदीप गावडे उभरते नेतृत्व असून त्यांच्या कार्यक्रमांमधून भाजपला एक हक्काचे व्यासपीठ मिळत आहे, असे गौरवोद्गार काढले.

Exit mobile version