Site icon Kokandarshan

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष आम. जयंतदादा पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सावंतवाडी,दि.२८ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुधवारी सकाळी ०८.२० वा. गोवा येथे त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर स.०९.०० वा. सावंतवाडी विश्राम गृह येथे जयंत पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. तदनंतर १०.३० वा. मालवण येथे आगमन होणार आहे. महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची ते पहाणी करणार असून त्यानंतर राजकोट येथील महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी केले आहे.

Exit mobile version