Site icon Kokandarshan

श्री भाईसाहेब सावंत विद्यालय माजगाव यांना जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद

संघाचे सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे अभिनंदन

सावंतवाडी,दि.२५: जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्री भाईसाहेब सावंत विद्यालय, माजगाव यांनी उपविजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय यशाबद्दल सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने विद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष दिगंबर मोर्यें, सचिव राहुल समुद्रे, खजिनदार संजय शेवाळे, तसेच डेगवे हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री मगदूम , बांदा हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक श्री सांगेलकर, श्री केंगले, श्री पालकर यांच्या उपस्थितीत श्री भाई साहेब सावंत विद्यालय माजगाव चे मुख्याध्यापक श्री चौरे तसेच मार्गदर्शक शिक्षक चंद्रशेखर सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या संघाचेकौतुक केले आहे.

Exit mobile version