गावात फोरजी सेवा सुरू करून विकासाला चालना देऊ.. खासदार विनायक राऊत..
सावंतवाडी,दि.१५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात दूरसंचार चे जाळे विणण्यासाठी १०४ फोर{जी} टॉवर मंजूर झाले आहेत. त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. लवकरच या टॉवर साठी जागा गावागावात उपलब्ध होईल आणि ते उभारण्यात येतील त्यामुळे गावात आता मोबाईलचे जाळे दुर संचार च्या माध्यमातून विणले जाणार आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. पूर्वी टू जी आणि थ्रीजी चे टॉवर मंजूर झाले होते पण आपण दिल्ली दरबारी कोकणात आणि विशेषता आता फोरजी टॉवरची गरज आहे हे स्पष्ट केले आणि त्यामुळेच हे १०४ टॉवर मंजूर झाले आहेत त्यामुळे कुठलेही राजकारण न करता आपण गावांच्या विकासासाठी काम करत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गावागावात कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एक दिलाने काम करा असेही ते म्हणाले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्ते दिलीप राऊळ नामदेव राऊळ सौ सांगेलकर आधी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा तसेच पा रपोली येथील गाव विकास पॅनल मधून निवडून आलेले सरपंच कृष्णा नाईक व उपसरपंच संदेश गुरव यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी श्री राऊत पुढे म्हणाले कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोरजी ची गरज आहे हे ओळखून आपण दिल्ली इथून 4g चे 104 टॉवर मंजूर करून आणले आहेत. कलंबिस्त येथे फोर जी चा टॉवर मंजूर झाला आहे. लवकरच तो जागा उपलब्ध झाल्यावर उभारणीसाठी घेतला जाईल. आणि येत्या काही महिन्यात या भागात दूर संचाचा मोबाईल टॉवर सुरू होईल सह्याद्रीच्या पट्ट्यात पर्यटन दृष्ट्या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत विकास साधला जाईल या भागातील रस्ते, पूल, पाणी तसेच बँक सुविधा बाबतही आपण निश्चितपणे लक्ष देऊन ते प्रश्न सोडवले जातील सावंतवाडी तालुक्यात पाच व सहा फेब्रुवारीला आपण गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटी देणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले गावागावात कुठलेही पक्ष राजकारण न करता सर्वांनी एक दिलाने एकत्र येऊन गावच्या विकासासाठी काम करा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट संतोष सावंत व आभार रमेश सावंत यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.