Site icon Kokandarshan

शिवसेना नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत.. महायुतीच्या बैठकीला जाणार नाही… माजी आ. राजन तेली

सावंतवाडी,दि.२१: राज्याचे दमदार आणि कणखर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून तळ कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि महायुतीला यश मिळाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही. मंत्री रवींद्र चव्हाण हे महायुतीच्या लोकसभा निवडणूकीतील विजयाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांना आवर घालण्यासाठी मागणी करणार आहोत, रामदास कदम यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या बैठकीला जाणार नाही. असा पवित्रा आम्ही घेतला आहे, असेही श्री. तेली म्हणाले. यावेळी त्यांनी रामदास कदम यांचा निषेध व्यक्त केला. श्री. तेली आज सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे हे कोकणचे नेते आहेतच. पण, त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. तर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी होती. भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकावर जबाबदारी दिली होती. मोठ्या नेत्यांवर सामुदायिक राज्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे यात गल्लत होऊ नये असे श्री. तेली यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version