सावंतवाडी,दि.१९ : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका संघटना मजबूत करण्यासाठी नवनिर्वाचित सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली संपर्क यात्रा चालू असून संघटना बांधणी सुरू आहे.
या दरम्यान शनिवारी विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांच्याकडे उपतालुका पदाची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,जिल्हा समन्वयक बाळा गावडे,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोजा,महीला संघटीका सुकन्या नरसुले, भारती कासार, नम्रता झारापकर, शब्बीर मणियार ,शिवदूत अशोक परब,सुनील गावडे,अशोक धुरी, ओटवणे सरपंच दाजी गांवकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.