उबाठा शिवसेनेकडून नेमळे व वेत्ये येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..
Anand Dhond
विद्यार्थ्यांनी आई-बाबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी जीवाचे रान करून अभ्यास करावा.. रुपेश राऊळ
सावंतवाडी,दि.१८ : आपल्या कोकणातील गुणवत्ता ही शालेय स्तरापर्यंत खूप चांगली असते. मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो. म्हणून विद्यार्थ्यांनी आगामी काळात आपल्या आई-बाबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी जीवाचे रान करून अभ्यास करावा, असा अत्यंत मौलिक सल्ला उबाठा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी नेमळे, वेत्ये येथील शाळांमध्ये आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.नेमळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक-१, तसेच पाटकरवाडी शाळा क्रमांक-३ आणि वेत्ये येथील कलेश्वर विद्यालयातील मुलांना उबाठा शिवसेनेच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रे दरम्यान ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा जिल्हा समन्वयक बाळा गावडे बाळा गावडे, तालुका संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र मापसेकर, भारती कासार, श्रीमती कासार, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, बाळू परब, संजय गवस, कौस्तुभ गावडे, शब्बीर मणियार, अशोक दत्ताराम परब (शिवदूत), अशोक सावंत तसेच पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं. १ मध्ये नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, सदस्य स्नेहली राऊळ, एकनाथ राऊळ, सिद्धेश नेमळेकर, संज्योता नेमळेकर, शीतल नानोसकर,आरती राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ राऊळ, शाखा प्रमुख सचिन मुळीक, शंकर राऊळ, दिलीप भैरे, संगीता मुळीक, रुपाली चव्हाण, एकनाथ चव्हाण,बाळकृष्ण राऊळ, तुषार राऊळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गावकर मॅडम, सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.पाटकरवाडी शाळा नेमळे नं ३ मध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर राऊळ, हनु मांडकर, बाळा पाटकर, विजय राऊळ, जानू झोरे, गुंडू राऊळ, कोमल पाटकर, सानिका पेडणेकर, भैरवी पाटकर, दीपाली दळवी, रुचिरा राऊळ, सेजल पाटकर, लता झोरे, धनश्री खडपकर, सानिका नेमळेकर, प्रिया पिकुळकर, समृद्धी पिकुळकर, नूतन पेडणेकर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक आदि उपस्थित होते.वेत्ये येथील कार्यक्रमात शाखाप्रमुख सुरेश सातार्डेकर, ग्रामपंचायत सदस्या तन्वी गावकर, बुथ प्रमुख शशिकांत देऊलकर, भरत जाधव, पूनम माणगावकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्षा सायली गावकर, माजी उपसरपंच संतोषी गावकर, महेश देऊलकर आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनीही मनोगत व्यक्त केले. कोकणच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जे जे सहकार्य लागेल ते नक्कीच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.