Site icon Kokandarshan

उबाठा शिवसेना पक्षाच्यावतीने कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

सावंतवाडी,दि.१६: आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांचा पहिला गुरु हा शिक्षक असतो शिक्षक मुलांना घडविण्याचे काम करतो, त्यामुळे शिक्षकांचा आदर करा मोठमोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या,आई वडील मेहनत करून आपल्याला शिकवतात त्याची जाणीव ठेवून त्यांची स्वप्न पूर्ण करा अशा प्रकारचे मार्गदर्शन आज उबाठा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयातील मुलांना केले. सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रे दरम्यान ते बोलत होते.

यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आणि कुणकेरी येथील शिवसैनिक श्री सावंत यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, बाळू परब, सुकन्या नरसुले, संजय गवस कौस्तुभ गावडे, शब्बीर मणियार, अशोक परब, शिवदत्त घोगळे, नामदेव नाईक, प्रकाश गडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version