सावंतवाडी,दि.१६: इनरव्हील क्लबतर्फे रोटरी पार्क येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सुप्रिया सुनील सावंत यांचा ‘वीरपत्नी’ म्हणून इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांचे पती स्व. सुनील सावंत पंजाब येथे मागच्या वर्षी २०२३ सप्टेंबरला देश सेवेत असताना वीरमरण आले होते. या प्रीत्यर्थ हा सहृदय सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रेसिडेंट सुमेधा धुरी, सेक्रेटरी वैभवी शेवडे, खजिनदार पूजा पोकळे, आय एस ओ दर्शना देसाई, एडिटर देवता हावळ, व्हाईस प्रेसिडेंट शितल केसरकर आणि इनरव्हील मेंबर्स, रोटरी मेंबर्स आणि रोटरेक्ट मेंबर्स उपस्थित होते.