Site icon Kokandarshan

विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना अर्चना घारे परब यांच्या हस्ते किटचे वाटप

सावंतवाडी,दि.१४ : विश्वकर्मा योजनेच्या तब्बल १५२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील लाभार्थी यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी येथील अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील विश्वकर्मा योजनेच्या तब्बल १५२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत या किटचे वितरण करण्यात आले‌. यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष विशाल बागायतकर, मुन्ना गवस, वेंगुर्ला तालुका सचिव बबन पडवळ, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी, युवती अध्यक्षा सावली पाटकर, पुजा दळवी, हिदायतुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, ऋतिक परब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version