Site icon Kokandarshan

सावंतवाडी शहर स्वच्छतेच्या व विकासाच्या नावाने प्रशासनाने वाजवले तीन – तेरा…

नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराबाबत मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणार.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी,दि.११: येथील शहर नगरपरिषद परिसर एक सुंदर स्वच्छ कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळख होती. आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे नगरपरिष हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावामध्ये नगर परिषदेचा कारभार सुरू आहे दोन महिन्यापूर्वी घाई गडबडीने केलेली रस्ते सगळेच्या सगळे उकडून गेले असून येथे अपघात झाले, या अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले शहरातील सर्व पानंदी निसरड्या झाल्या असून अनेक लोक पडतात कुणाचं लक्ष नाही.

सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे चौकाचौकात रस्त्या रस्त्यावरती कचरा साठलेला आहे सर्वत्र डासांची फैलाव झालेला आहे मच्छी मार्केट अस्वच्छ, रस्त्याच्या साईट पट्ट्या निसरड्या झाल्या असल्याने येथून जाणारे नागरिक पडत आहेत. सार्वजनिक स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी बंद असतात गार्डन स्मशानभूमी अस्वच्छता तसेच भष्टकारभाराचा जाब विचारण्यासाठी उद्या मंगळवार १२ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देत त्यांना याबाबत जाब विचारणार असल्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकार द्वारे म्हटले आहे.

Exit mobile version