Site icon Kokandarshan

कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचा ९ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा..

सावंतवाडी,दि.०७: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या उपस्थिती ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे तरी या उद्घाटन समारंभाला मतदार संघातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांनी केले आहे.

Exit mobile version