दोडामार्ग,दि.०४: गेला महिनाभर कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने लोकांची दैना उडाली आहे. दोडामार्ग येथील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका सामान्य शेतमजुराचे घर भर पावसात कोसळले. आकाशाइतकाच भीतीदायक अंधार मनात पसरला असताना सावंतवाडीचे युवा नेतृत्व, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पूरपरिस्थितीतील दोडामार्ग तालुक्यात पोहोचले. त्या शेतमजूराला धीर देत त्याला तातडीच्या डागडुजीसाठी लागणारी आर्थिक मदतही त्यांनी केली.
दोडामार्ग तालुक्यातील रामा यशवंत उसपकर यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यातच भर पावसात घर कोसळले आणि संकटाने कहर केला. दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्याची स्थिती विशाल परब यांच्या कानावर घातली. गोरगरिबांची कणव असलेल्या या युवा नेतृत्वाने तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. निसर्गाने झोडपले, पण भाजपाने सावरले असा अनुभव आज उसपकर कुटुंबियांना आला. मोडून पडलं घर तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशा आत्मविश्वासाने रामा उसपकर पुन्हा एकदा भाजपा कार्यकर्त्यांच्या आणि संवेदनशील भाजपा नेते विशाल परब यांच्या तातडीच्या मदतीमुळे सावरत आहेत. लवकरच शासकीय मदतीसाठी त्यांचा प्रस्ताव पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाकडे सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती विशाल परब यांनी दिली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासमवेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, पराशर सावंत, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस, दिपक गवस, सरपंच देवेंद्र शेटकर, क्षाणी बोडेकर, विठोबा गवस, भिवा गवस, नाना गवस, हरिश्चंद्र गवस, अंकुश गवस, सुमती चिडकर, पांडुरंग गवस, बजरंग गवस, किशोर नाईक, नितू गवस, बुध अध्यक्ष भिवा नाईक, मुकूंद गवस, सर्वेश गवस, समीर रेडकर, बाळू गवस, खडपकर आदी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.