कुडाळ,दि.३०: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा हुमरस येथे भारतीय जनता पक्ष आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वि. न. आकेरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील गोष्टी व आपल्या गुरुविषयी माहिती देत मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात ज. मू. कदम, अशोक शिवलकर यांनी पुराणातील गोष्टींचे दाखले देत व्यास पौर्णिमेचे महत्व सांगितले, तसेच भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या गुररुंविषयी माहिती देत उत्साहाचे वातावरण तयार केले.
लोकनियुक्त सरपंच सिताराम तेली यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निलेश तेली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दरम्यान संजय वेंगुर्लेकर व रूपेश कानडे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप केले.
कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रवीण वारंग, शक्तीकेंद्र प्रमुख सोनू मेस्त्री, बूथ अध्यक्ष समीर सावंत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कुंभार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका दिप्ती तळवणेकर, सामाजिक कार्यकर्ते व आदर्श ग्रामस्थ दाजी वारंग, विष्णू परब, झाराप ग्रामपंचायत सदस्य श्री. हरमलकर, हुमरस ग्रामपंचायत सदस्या श्रुती चिपकर, श्रेया मेस्त्री, तसेच हुमरस ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.