Site icon Kokandarshan

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सावंतवाडी संपन्न…

..दरम्यान दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी,दि.३०: श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेने चांगला नफा कमवला असून सातत्याने अ वर्ग राखून ठेवला आहे सर्व सभासद ठेवीदार यांच्यासह कार्यामुळे पतसंस्था यशस्वी तिकडे वाटचाल करत असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.
श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सावंतवाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहामध्ये पार पडली,यावेळी ते बोलत होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुरुवातीला अहवाल वाचन झाले त्यानंतर सभासदांच्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधव प्रतीथयश ऍड आणि अनिल निरवडेकर व सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता विजय चव्हाण यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
केवळ दहावी बारावी करून न थांबता विद्यार्थ्यांनी यूपीएससी एमपीएससी ची परीक्षा देऊन
अधिकारी होऊन जिल्ह्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून ॲड निरवडेकर आणि श्री चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पतसंस्थेचे संचालक गणेश म्हापणकर, प्रकाश रेडकर, परशुराम चव्हाण, मंगेश कदम, सौ. संगीता वाडकर, सुलोचना वाडकर, व्यवस्थापक सदानंद चव्हाण, तसेच माजी संचालक नरेश कारिवडेकर, गुंडू चव्हाण,दशरथ चव्हाण आदी उपस्थित होते. सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी सभासदांचे स्वागत केले अहवाल वाचन व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांनी केले तर शेवटी आभार परशुराम चव्हाण यांनी मानले.

Exit mobile version