सावंतवाडी,दि.२७ : एप्रिल २०२४ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विधी शाखेच्या तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. दरम्यान, सावंतवाडीतील पंचम खेमराज “लाॅ” कॉलेजचे विद्यार्थी पत्रकार भगवान शेलटे यांनी या परीक्षेत सुयश प्राप्त केले असून ते ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
पंचम खेमराज “लाॅ” कॉलेजचा निकाल ९९ टक्के लागला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थांना कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, ॲड.पूजा जाधव,ॲड.अश्विनी वेंगुर्लेकर,ॲड.अभिरुची राऊळ,ॲड.सोनाली कुडतरकर,ॲड.श्रीषा कुलकर्णी याचं मार्गदर्शन लाभलं.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, तसेच श्रद्धाराजे भोसले, ॲड. शामराव सावंत, डी.टी देसाई, डॉ. सतीश सावंत, डॉ. दिलीप भारमल, जयप्रकाश सावंत व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून व “लॉ” कॉलेज कडून अभिनंदन करण्यात येत आहे.