Site icon Kokandarshan

माजी आमदार राजन तेली वाढदिवस अभिष्टचिंतन…

सावंतवाडी,दि.२५ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक प्रमुख नाव म्हणून राजन तेली यांच्याकडे पाहिलं जातं ..

जिद्द,चिकाटी,मेहनत आणि नेतृत्व गुण यांच्या जोरावर सामान्य माणूस असामान्य कार्य करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजन तेली.

कणकवली तालुक्यात जन्मलेले आणि शालेय जीवनापासून अतिशय हुशार आणि नेतृत्व गुण असलेले राजन तेली ९० च्या दशकात राजकारणात आले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत, पक्षाची विविध पदे भूषवली, व जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

जिल्हा परिषद अध्यक्ष ते विधान परिषद आमदार असा प्रवास करत आज भाजप सारख्या एका मोठ्या पक्षाचे नेते अशी जिल्ह्यात राजन तेली यांची ओळख आहे.

दरम्यानच्या काळात राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभेतून दोन वेळा निवडणूक लढवली मात्र काहीशा फरकाने या निवडणुकीत ते पराभूत झाले.
पराभवाने खचून न जाता त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले.आणि आज जिल्ह्यात भाजप पक्ष वाढीस राजन तेली यांचा मोलाचा वाटा आहे.

आज राजन तेली यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण दर्शन डिजिटल मीडिया चॅनलने घेतलेला हा धावता आढावा.

कोकण दर्शन डिजिटल मीडिया परिवारा तर्फे माजी आमदार राजन तेली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Exit mobile version