Site icon Kokandarshan

केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ओवळीये येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सावंतवाडी,दि.२०: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओवळीये माजी सरपंच विनायक उर्फ अब्जु सावंत यांनी आपल्या स्वखर्चातून ओवळीये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी ओवळीये गावच्या सरपंच तारामती नाईक, माजी सरपंच विनायक सावंत,शाळेचे मुख्याध्यापक श्री चौरे,श्री गोरे श्री बांदेकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version