सावंतवाडी,दि.२०: ना. दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव शाळेतील २१२ विद्यार्थ्यांना काजू कलमाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, यांनी मुलाना मार्गदर्शन केले.दरम्यान वाढदिवसानिमित्त दोन गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
ही स्पर्धा ५ वी ते ७ वी या गटामध्ये घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री सावंत,द्वितीय क्रमांक राज सावत, तृतिय क्रमांक त्रिशा शेटकर तसेच ८ वी ते १० वी या गटात प्रथम क्रमांक भक्ती सावंतभोसले, व्दितीय क्रमांक कु. वेदांत सावंत, तृतिय क्रमांक ज्ञानेश्वरी सावंत यांना पारितोषीके देण्यात आली.
त्याचप्रमाणे माजगाव गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेतील मुलांना मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा प्रमुख अशोक दळवी,नारायण राणे,संजय माजगांवकर, श्रीम. सुनिता जाधव, पांडुरंग नाईक,रुपेश नाटेकर,मंदार सावत, सचिन सावंत,सुनील रेडकर,संदेश सोनुलेकर, एकनाथ हळदणकर, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे,शिक्षक चंद्रशेखर सावंत, राज सावंत, सिद्धेश कानसे, रोहित केंगले, प्राजक्ता गावडे, शितल गावडे, विविधा देसाई, मृणाली जाधव,गणेश केरकर, महादेव जाभळे आदी कार्यकर्ते व शिक्षक वर्ग उपस्थित होते.