Site icon Kokandarshan

मुंबई गोवा महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे..रखडलेल्या कामाबाबत माजी खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधानांना केला पत्रव्यवहार

…रखडलेल्या कामाबाबत माजी खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधानांना केला पत्रव्यवहार

चिपळूण,दि.१८:(ओंकार रेळेकर) मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले वीस वर्षे रखडले आहे. या कामी शिवसेना पक्ष वारंवार पाठपुरावा करत असून मुंबई गोवा महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाची कामे झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे दरम्यान या मार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगदा नुकताच वाहनधारकांसाठी सुरू करण्यात आला असून या बोगद्याच्या वरील बाजूस डोंगरातील पाणी गळती सुरू आहे.याप्रकरणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आहे पंतप्रधानांना पत्रव्यवहार करून या मार्गाच्या कामात आपण स्वतः लक्ष घालावे अशी मागणी करून संबंधित हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आपण लेखी निवेदनात पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे अशी माहिती अशी माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी चिपळूण दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी जे ठेकेदार नेमले आहेत त्यांच्या कामाचा दर्जा अतिशय नित्कृष्ट असल्याचा आरोप सर्वत्र होत असतानाच या विषयात आता शिवसेना पक्षाचे नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी या विषयात लक्ष दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे कारण वर्षातच महामार्ग उकळू लागला आहे कशेडी बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्या पावसातच या बोगद्याला गळती लागली आहे भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कशेडी बोगद्याच्या कामाची चौकशी करावी, अशी तक्रार माजी खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गुरुवारी चिपळूण दौऱ्यावर असताना माजी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली. राऊत म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मी खासदार होतो तेव्हा केंद्र आणि राज्य शासनाकडे याचा
वारंवार पाठपुरावा करून काम करून घेतले. परंतु जे ठेकेदार आणले गेले त्यांनी कामाचा दर्जा न ठेवल्याने वर्षभरात महामार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. महामार्गातील कशेडी बोगदा २ किमीचा आहे परंतु या बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बोगदा धोकादायक बनला आहे. याकडे मी सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. पहिल्या पावसात पाणी झिरपू लागली आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. याकडे मी सर्वांचे लक्ष वेधले आहे.नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे अशी माहिती विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.
मुंबई-गोवा महामार्गाचे विशेषतः कशेडी घाट व बोगदा येथील निकृष्ट दर्ज्याचे जे काम अधिकारी व ठेकेदार यांच्या साट्यालोट्यातून झाले आहे त्यामुळे महामार्गवरून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात अनेक वर्ष वारंवार आवाज उठवून, संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कुणी याकडे फारसे गांभीर्याने बघत नसल्याने अखेर विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.गेली सुमारे १९ वर्षे ह्या रस्त्याचे काम सुरु आहे, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागातील रस्त्याचे काम पुर्ण होत असताना, महामार्गवरील महत्वाच्या अश्या कशेडी येथील काम केवळ ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे व निर्ढावलेल्या वृत्तीमुळे राखडले असून यात आपण स्वतः तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करत राखडलेले काम लवकरात लवकर पुर्ण करून घ्यावे अशी मागणी आपण पत्राद्वारे पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे असे राऊत म्हणाले.

Exit mobile version