Site icon Kokandarshan

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशासाठीच करावा – अमेय गोडबोले..

ब्राह्मण संघाचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

चिपळूण,दि.१५: (ओंकार रेळेकर) – “विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त आणि फक्त आपल्या देशासाठीच करावा. तसेच आपण घेत असलेले शिक्षण फक्त पैसे कमविण्यासाठी न घेता, त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या ज्ञानाच्या वाढीसाठी व आपल्या समाजासाठी झाला पाहिजे.” असे विचार गोडबोले’ज् क्लासेसचे अमेय गोडबोले यांनी ब्राह्मण संघाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
चिपळूण मधील ब्राह्मण सहाय्यक संघातर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी १४ जुलैला उत्साहात संपन्न झाला. दिवसभर पावसाची संततधार असताना देखील गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने गुणगौरव सोहळ्याला उपस्थित होते. गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी ब्राह्मण संघातर्फे चिपळूण व परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा तसेच पदवीधर झालेल्या ब्राह्मण ज्ञातीतील पहिल्या तीन ब्राह्मण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.
सदर गुणगौरव सोहळ्यात दहावीतील इप्शिता योगेंद्र टिळक, पार्थ प्रसाद चितळे, ऋषिकेश प्रसाद डोंगरे (युनायटेड इंग्लिश स्कूल), शशांक चंद्रेश शुक्ला, निशी संजय त्रिपाठी, आदर्श सानोज बार्थवल (बांदल हायस्कूल), स्वानंद मनोज कुलकर्णी, अनुराधा महेश पटवर्धन (न्यू इंग्लिश स्कूल, सती), मृण्मयी शशिशेखर कुलकर्णी, सावनी राहूल ओक, गायत्री नरेंद्र फडके, अद्वैत मंगेश जोशी, साजिरी संदिप परुळेकर (एस.पी.एम. परशुराम), चैतन्य मिलिंद सालये, केतकी कल्याण गोंधळेकर, तन्वी महेश बापट, लाघवी चंद्रशेखर सावले, गायत्री प्रमोद मिश्रा (गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल), श्रीयश श्रीराज गणपुले (आर.सी.काळे माध्यमिक विद्यालय, पेढे), आर्या अभिजित बर्वे, सई सचिन भुजंग, श्रीवत्स प्रसन्न कुलकर्णी, शारदा वैभव भाटे (मेरी माता हायस्कूल, खेर्डी), तसेच बारावी वाणिज्य शाखेतील दिया पद्माकर कुलकर्णी, वेद गजानन दाते (गद्रे उच्च माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कूल), अद्वैत मनिष कामत (एस.पी.एम. उच्च माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कूल), प्रणय मिलिंद गोडबोले, राजस अविनाश वैद्य, संस्कार संजय शुक्ला (डी.बी.जे. महाविद्यालय), शास्त्र शाखेतील श्रावणी संतोष जोशी, कल्याणी विनायक करमरकर, ईशा उदय पंडीत (गद्रे उच्च माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कूल), प्रणव प्रसाद जोशी, चैतन्य उदय भागवत (न्यू इंग्लिश स्कूल, सती), प्रिती प्रदिप जठार, श्रावणी योगेश बापट, रुचा मंदार पातकर (डी.बी.जे. महाविद्यालय), बारावी कला शाखेतील आयुष अभय आगवेकर, शाम्भवी अभय पोंक्षे (डी.बी.जे. महाविद्यालय) तसेच बी.कॉम. उत्तीर्ण आदित्य सचिन कान्हेरे, श्रावणी सतीश खरे, अथर्व जितेंद्र गोंधळेकर व आठवी स्कॉलरशिप प्राप्त स्वरांगी प्रमोद जोशी व मेघन तेजानंद गणपत्ये (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दहावीत पूर्ण संस्कृत विषयात सर्वोत्तम गुणांसाठी कै. श्रीकांत प्रभाकर गोवंडे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी म्हणून अद्वैत मंगेश जोशी, सावनी राहूल ओक (एस.पी.एम. उच्च माध्यमिक इंग्लिश मिडीयम स्कूल), पार्थ प्रसाद चितळे, ऋषिकेश प्रसाद डोंगरे, आर्यन दिनेश लांजेकर, श्रेया सुनिल गुरसळे, युक्ता समीर जाधव, श्लोका शैलेंद्र पवार तसेच नववीत पूर्ण संस्कृत विषयात युनायटेड इंग्लिश स्कूल मधील सर्वोत्तम गुणांसाठी कै. भार्गव पांडुरंग चितळे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी स्वरा मिलिंद विखारे, आर्या जितेंद्र मिरगल या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे दहावी व नववी मधील या विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
या गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांपैकी स्वरांगी जोशी, गायत्री फडके तसेच पालकापैकी मिलिंद विखारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ब्राह्मण सहाय्यक संघाचे आभार मानले.
या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोडबोले’ज् क्लासेसचे अमेय गोडबोले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष अविनाश पोंक्षे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रमेश चितळे यांनी करताना ब्राह्मण सहाय्यक संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मधुसूदन केतकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली चितळे यांनी केले. ध्वनी व्यवस्था संजय नाचणकर व सभागृह व्यवस्था सचिन चितळे यांनी पाहिली. सर्वांना अल्पोपहार व कॉफीची व्यवस्था आदर्श कॅटरिंगचे मंदार काणे यांनी केली.
या कार्यक्रमाला ब्राह्मण संघाचे विश्वस्त आनंद चितळे, उपाध्यक्ष सौ. शीला केतकर, सुधीर पोटे, सचिव रमेश चितळे, सदस्य राजूशेठ कानडे, मिलिंद पिंपुटकर, संजय जोशी, सुनिल जोशी तसेच डॉ. मधुकर जोशी, नित्यानंद भागवत हे उपस्थित होते.

Exit mobile version