Site icon Kokandarshan

व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता.. !

…अखेर मागण्या मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांचे लेखी पत्र.

मुंबई,दि.११ : महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरामध्ये सर्व तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती अधिकारी कार्यालय आणि काल बुधवारी मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्याच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेले हे उपोषण मागे घेण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच काल दुपारी हे उपोषण सोडवण्यासंदर्भात सूचना दिल्या. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर माहिती उपसंचालक आणि मुख्यमंत्र्याचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्ठपुत्रे यांनी आज आझाद मैदानावर उपोषण स्थळी येऊन व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के , मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले लेखी पत्र सुपूर्द केले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनामध्ये एकूण १३ मागण्या प्रामुख्याने ठेवण्यात आल्या होत्या. या मागण्या मंजूर झाल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सांगण्यात आले.
काही मागण्या संदर्भामध्ये समिती गठीत करून त्यावर विचार केला जाणार आहे. तर काही मागण्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. मागील एका वर्षापासून व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भामध्ये मागणी करण्यात आली. मात्र या मागणीकडे शासनाने सातत्याने कानाडोळा केला. मागच्या आठवड्यामध्ये राज्यभरात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने ३४२ ठिकाणी आंदोलन झाली. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॉईस ऑफ मिडियाच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलवले. मी मागण्यांवर सकारात्मक विचार करतो तुम्ही आंदोलन करू नका, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची होती. मात्र व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत या मागण्या संदर्भामध्ये सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन व आंदोलनाचे टप्पे असेच सुरू राहतील अशी भूमिका घेतली होती. त्याच आंदोलनाचा टप्पा म्हणून काल बुधवार पासून आझाद मैदानावर व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्याने उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दुपारी हे उपोषण सोडवण्यासाठी येणार होते. पण दिल्लीच्या पुरस्कार सोळावा उपस्थित राहण्यासाठी अचानकपणे जावं लागल्यामुळे त्यांनी सल्लागार विनायक पात्रुडकर, अष्टपुत्रे यांना हे आंदोलन सोडण्यासाठी पत्र घेऊन पाठवले. त्या पत्रामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या मागणी संदर्भामध्ये आणि केलेल्या आंदोलनासंदर्भामध्ये स्पष्ट उल्लेख करून पत्रकारांसाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या आंदोलनामध्ये राज्यभरातून पदाधिकारी सहभागी झाले होते. पत्रकारांना मिळालेला न्याय हा व्हाॅईस ऑफ मीडियाच्या प्रत्येक पदाधिकारी सदस्य पत्रकारांचा असल्यास मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी आंदोलनाच्या समारोपाप्रसंगी सांगितले. भर पावसात राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांनी आभार मानले.

Exit mobile version