Site icon Kokandarshan

पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळ्या फिती बांधून आंदोलन

सिंधुदुर्ग,दि.०४: ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, सोशल मीडिया या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, कार्याध्यक्ष आनंद धोंड, सह. सचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, जिल्हा उपाध्यक्ष भूषण सावंत,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी,आनंद कांडरकर,विष्णू धावडे,नयनेश गावडे,सिद्धेश सावंत,लवेश साळुंखे,विराज गोसावी, राजेंद्र दळवी, राजेश हेदळकर,चिन्मय घोगळे, वासुदेव गावडे, सुयोग पंडित, मयूर ठाकूर,सिद्धेश विवेक परब,प्रथमेश गवस आदी पत्रकार उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version